बैल पोळा सणाची संपूर्ण माहिती

Bail Pola Information in Marathi – मराठी सणाची सुरुवात होते ती श्रावण महिन्यात नागपंचमी च्या सणाने आणि त्यानंतर नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी पाठोपाठ श्रावण अमावस्या ला येणारा सन म्हणजेच पोळा किंवा बैलपोळा. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा श्रावण अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. श्रावणात या अमावस्येला जिला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा शेतकऱ्यांचा सण म्हणजे “पोळा”.

गणेश चतुर्थी ची माहिती

Bail Pola Information in Marathi | बैल पोळा सणाची माहिती (2023)

बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक मराठी सण म्हणून बैलपोळा सन ओळखला जातो. विशेषतः विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या राज्यांमध्ये मध्य प्रदेश व तेलंगणा मध्ये सण साजरा होतो. कर्नाटकातही हा सन साजरा केला जातो पण “बेदूर” या नावाने. बैल पोळा हा दिवस बैलांचा आरामाचा/ विश्रांतीचा दिवस असतो. Bail Pola Information in Marathi पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते ते खालीलप्रमाणे:

“आज आवतन घ्या आणि उद्या जेवायला या!”

पोळ्याच्या दिवशी सकाळ सकाळी गायी-बैलांना अंघोळ घातली जाते. पोळ्याच्या दिवशी बैलांचा मोठा थाट असतो. त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर त्यांना चारून घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (आता तेलाने) शेकतात. याला ‘खांद शेकणे’ अथवा ‘खांड शेकणे’ म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली सुंदर झूल, अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या आवाज करणाऱ्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. बैलांचा गोठा स्वच्छ केला जातो.

घरातील सुवासीनी बैलांची विधीनुसार पुजा करतात. बैलांना पोळयाच्या दिवशी सुट्टी असते म्हणजे त्यांना कोणतेही काम करू दिले जात नाही. Bail Pola Information in Marathi गोडाधोडाचा पुरणपोळीचा नैवद्य त्याला भरवला जातो. विशेष म्हणजे बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ गड्याला नवीन कपडेहि देण्यात येतात. बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावातील हनुमान मंदिरात नेले जाते.

सर्व शेतकरी आपापल्या बैलांच्या जोडया घेउन गावात एका ठिकाणी एकत्र येतात. ते ठिकाण म्हणजे बहुतेक गावातले हनुमान मंदिर किंवा शाळेचे मोठे मैदान असते. या सणासाठी बैलांबरोबर शेतकरीहि मोठ्या आतुरतेने वाट बघत असतो. शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा शृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. Bail Pola Information in Marathi या दिवशी, गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आखरावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधले जाते.

तसेच या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र वाजवले जातात. या वेळेस पोळ्याची गाणे म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, गावचा पाटील म्हणजेच श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. घरी निघतांना बैलांना घरोघरी नेल्या जाते तेथे घरातील सुवासिनी बैलांची पुजा करतात. बैल नेणाऱ्यास पैसे देण्यात येतात त्याला “बोजारा” म्हटले जाते. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा केला जातो.

वर्षभर शेतात शेतकऱ्याबरोबर बरोबरीनेच राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणुन पोळा या सणाकडे आपण बघितले जाते. Bail Pola Information in Marathi आजच्या आधुनिक जमान्यातही पुर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरांप्रमाणे हे उत्सव आजही महाराष्ट्रातील गावागावांमधुन साजरे होतांना आपण आजही बघतोच.

बैलाची पूजा का करतात?

आपल्या पुराणामध्ये “बैलपोळा” बद्दल कथाही सांगीतल्या आहेत.

पहिली कथा आहे ती शंकर-पार्वतीची :

तर झाल काय कैलासावर (शंकर-पार्वती राहतात ते ठिकाण) शंकर आणि पार्वती सारीपाट खेळत होते आणि पार्वतीने डाव जिंकला पण शंकरदेव म्हणाले की मी हा डाव जिंकला आणि त्यावरून दोघांमध्ये मोठे वाद सुरू झाले. या वादाला साक्षी होता तो म्हणजे फक्त नंदी त्यामुळे पार्वतीने नंदीलाच विचारले की हा डाव कोणी जिंकला त्यावेळी नंदीने शंकराची बाजू घेतली.

त्यामुळे पार्वती मातेला खूप राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. “मृत्यु लोकी तुझ्या मानेवर जू बसेल. तुला जन्मभर कष्ट करावे लागतील” हा शाप ऐकून नंदीला त्याची चूक लगेच समजली. त्याला खूप वाईट वाटले तेव्हा देवी पार्वतीला माफी मागितली. देवी पार्वती ने सांगितले की, “शेतकरी वर्षातून एक दिवस देव मानून तुझी पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाहीत” आणि तेव्हा पासूनच हा “बैलपोळा” हा सण साजरा केला जातो.

दुसरी अजून एक कथा अशी आहे ती भगवान श्रीकृष्णांची:

Bail Pola Information in Marathi बैलपोळा या सणाला “पोला” असेही म्हणतात, कारण पूर्वी याच दिवशी पोलासुर असुराने बालवयात कुष्णावर हल्ला केला होता, त्यात त्या राक्षसाचा वध झाला. म्हणून त्या राक्षसाच्या नावावरून या सणाला “पोला” असेही म्हणतात.

या दिवशी बैलांना शेतकरी भल्या पहाटे आंघोळ घालून त्यांना खूप सजवतात. घरात पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे विविध प्रकारचे गोड-धोड पदार्थ बनवले जातात. बैलांचा सुट्टीचा दिवस म्हणजे बैलपोळा. पार्वतीने दिलेल्या शापाप्रमाणे या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेतकरी त्यांच्याकडून करून घेत नाही. बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते. त्यांना शाही स्नान घातले. सर्व जनावरांना पुरणपोळी बनवली जाते. काही दाण्यांची खिचडी ही (घुगर्या), पुरण पोळी बरोबर जनावरांना दिली जाते. त्या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात असतात. त्यांना घरातील महिला ओवाळतात. त्यांची पूजा करतात.

ज्यांच्याकडे बैल नाहीत ते मग मातीच्या बैलांना पूजतात. त्यांना देखील सजवले जाते. त्यांची देखील स्पर्धा असते. ती म्हणजे कोणाचा बैल जास्त छान सजला आहे. बक्षीसही ठेवलेली असतात. Bail Pola Information in Marathi मोठ्या उत्सहाने शेतकरी यात सामील होतात. फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करायची. आत्ता आधुनिक अवजारे वापरली जातात. गहू काढण्याचे हि यंत्र आले आहे. त्यामुळे कष्टाचे काम कमी झाले आहे. बैलाविषयी अनेक कथा, कविता, चित्रपट, गाणे आणि लेखही प्रसिद्ध आहेत. Bail Pola Information in Marathi शेतकऱ्यांचा सखा म्हणजे बैल असतो. त्यांचा सगळ्यात आवडीचा दिवस म्हणजे बैलपोळा.

या सनावरून असे लक्षात येते कि, हिंदु संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजिवांना देखील पुजनीय मानले जातं.

Leave a Comment