गणेश चतुर्थी सणाची संपूर्ण माहिती

श्री गणेश चतुर्थी

Ganesh Chaturthi 2023 – गणपती संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केली जाते. तो सर्व गणांचा “अधिपती” आहे असे त्यात म्हटलेले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे स्वरूप Ganesh Chaturthi 2023 Information in Marathi प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात “गणेशोत्सव” साजरा होत आल आहे. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

Ganesh Chaturthi 2023 | गणेश चतुर्थी माहिती मराठी

गणेश चतुर्थीला सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये बंद असतात कारण या दिवशी गणपती स्थानापन्न होतात. गणेश चतुर्थी हा संपूर्ण भारतात साजरा होणारा मुख्य सण आहे. हा Ganesh Chaturthi 2023 उत्सव दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यानच्या इंग्रजी दिनदर्शिकेनुसार आयोजित केला जातो, तर हिंदू दिनदर्शिकेनुसार हा उत्सव भाद्रपद महिन्यात येतो. हा सण 10 दिवसाचा सण म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव गणेश चतुर्थीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला संपतो. Ganesh Chaturthi 2023

सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात Ganesh Chaturthi 2023

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ती १८९४ साली केली. Ganesh Chaturthi भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा अगदी योग्य वापर केला. गणेशोत्सव व शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.

आज महाराष्ट्रत हिंदू धर्मामध्ये “बुद्धी” आणि “समृध्दी” चा देवता म्हणून गणपती ओळखला जातो. गणेश चतुर्थी हा सन श्री गणेशाची जयंती म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त आहे. असे मानले जाते की, गणेशाला प्रसन्न केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. भगवान गणेशाला “विघ्नहर्ता/ विघ्ननाशक” या नावानेही संबोधले जाते म्हणजेच भक्तांचे सर्व अडथळे दूर करणारे आणि राक्षसांसाठी अडचणी निर्माण करणारा. गणेश जी इतर नावांनी देखील ओळखले जातात:- तसे, श्री गणेशाची एकूण 108 नावे आहेत. परंतु आम्ही त्यांची मुख्य 12 नावे खालीलप्रमाणे आहेत,

१. सुमुख २. एकदंता ३. कपिला ४. गजकर्ण ५. लंबोदर ६. विकता ७. विघ्ननाशक ८. विनायक ९. धूमकेतू १०. गणध्याय ११. भालचंद्र १२. गजानन

आपण सर्व जन हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतो.तिथीप्रमाणे यावर्षी गणेश चतुर्थी 2023 ला हा उत्सव बुधवार, 19 September या दिवशी आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव सुरु होतो. (Ganesh Chaturthi 2023)

लोक गणेश चतुर्थीची तयारी दोन महिन्यांपूर्वीच करायला लागतात. Ganesh Chaturthi Information in Marathi तो इतर सणांप्रमाणे एका दिवसात संपत नाही तर हा सण 10 दिवस सण म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाच्या तयारीसाठी, मूर्तिकार माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यास दोन महिन्यापूर्वीच सुरुवात करतात. या सणाच्या सात दिवस आधीच बाजारात मूर्ती येण्यास सुरुवात होते. बाजारपेठ आणि गल्ल्यांना रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जाते, जे अतिशय मोहक दिसते. या सणाच्या आगमनापूर्वी बाजारात एक अनोखी चमक येते, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो. शेतात पिकही बहरलेले असते.

अगदी वाजत गाजत श्री गणेशाची मूर्ती घरी आणली जाते. (Ganesh Chaturthi 2023) या दिवशी घरोघरी गणपती ची मूर्ती स्थापन केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीची आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा करतात. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. रोज सकाळ व संध्याकाळ गणपतीची पूजा केली जाते. बाप्पाला मोदक आणि लाडू खूप प्रिय आहेत. म्हणून त्याला मोदकाचा नैवद्य दाखवतात.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. हा उत्सव दहा दिवस चालतो. मंडळातील सभासद घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करतात. गणपतीची मूर्ती आणून तिची सार्वजनिक ठिकाणी स्थापना करतात. बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा करतात. दोन वळी आरती होते. लाडू-मोदक यांचा प्रसाद वाटला जातो. हा उत्सव गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो जो माता पार्वती आणि भगवान शिव यांचा पुत्र आहे. तो बुद्धी आणि समृध्दीचा देवता आहे, म्हणून लोक समृध्दी मिळवण्यासाठी त्याची पूजा करतात. गणपती हा विघ्नहर्ताही आहे. त्यामुळे कुठले हि कार्य आरंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते.

(Ganesh Chaturthi 2023) गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी पहिली गोष्ट, आंघोळ केल्यानंतर लाल कपडे घातले जातात. कारण लाल रंगाचे कपडे गणेशाला अतिशय प्रिय आहेत. पूजेदरम्यान, श्री गणेश जीचा चेहरा उत्तर किंवा पूर्व या शुभ दिशेलाच ठेवला जातो.

अनंतचतुर्दशीला म्हणजेच दहाव्या किंवा अकराव्या दिवशी बाप्पांचे विसर्जन होते. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात.

Ganesh Chaturthi Information in Marathi

मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात.

’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जवळच्या जलाशयात तिचे विसर्जन करतात. ती मिरवणूक मोठ्या आनंदात, ढोल-ताश्यांच्या आवाजात निघते. फटाके फोडत गणरायाच पाण्यात विसर्जन होते त्यावेळी रस्ते, माणसे गुलालांनी लाले लाल झालेली दिसतात. मोठ्या संख्येने भक्तगण हि मिरवणूक बघण्यासाठी उपस्थितीत राहतात.

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवरकर या”

“एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार”

“अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर”

या शब्दांनी आसमंत घुमुन जातो. भक्तगण आपल्या गणेशाला मोठ्या दुःखी अंत:करणाने निरोप देतात.

पण का हे सर्व केले जाते?

त्याच्यामागे कारण कुणीच सांगू शकत नाही. या सणामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यास मदत झाली कारण जेव्हा ब्रिटिशांनी भारतीय लोकांच्या एकत्र येण्यावर आणि बसण्यावर बंदी घातली होती.

ज्यामुळे लोक एकमेकांशी चर्चा करू शकले नाहीत कारण धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी नव्हती, म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अतिशय चतुराईने गणेश चतुर्थीच्या या सणाला मोठ्या उत्सवाचे स्वरूप दिले, त्यानंतर सर्व संघटनांनी बैठकीला सुरुवात केली हा सण आणि यामुळे स्वातंत्र्य मिळण्यास खूप मदत झाली.

इंग्रजांच्या, मुसलमानांच्या कचाट्यात सापडलेला हिंदू समाज सैर-भैर झाला होता. आपले कोण आणि परके कोण, याचा पर्दाफाश होत नव्हता. तेव्हा हिदूंनी देवतांच्या शाक्षीने एकत्र येणे महत्वाचे होते. Ganesh Chaturthi 2023 त्यामुळे एकीच्या तत्वाने प्रेरित होऊन लोकमान्य टिळकांनी “गणेशोत्सव” आणि “शिवजयंती” हे दोन उत्सव सुरु केले. त्या काळी छोटासा गणपती आणून गावस्वरूप सार्वजनिक गणपती बसवला जात असे. गावातील सर्व जन घरचेच काम म्हणून झटून काम करत असे.

चार दिवस अगोदर तयारीला सुरुवात होत. (Ganesh Chaturthi 2023) त्यात सर्वप्रथम आपल्या परिसराची स्वच्छता करत. आकर्षक सजावट, गणपती स्थापना, गणपती विसर्जन यात सार्वजन उत्सुकतेने सहभाग घेत असे. सकाळ-संधाकाळ आरती, प्रसाद, रात्रीचे कीर्तन, प्रवचन यांचे आयोजन करून गावातील मुलांना, कलाकारांना त्यांच्या कला जोपासायला वाव मिळत असे. गावातील मुली, स्त्रिया रांगोळी घालणे, देवाला हार बनवणे, घरच्या पंचपक्वानांचा नैवद्य गपातीला दाखवणे इ. कामे हौसेने करत. हे उत्साहाचे दहा दिवस आनंदाचे असत. भांडणतंटा नाही, मान अपमान नाही त्यामुळे पूर्ण गाव एका कुटुंबाप्रमाणेच दहा देवासाच्या गणेशोत्सवात वावरत असत. दहा दिवसात दशावतार, छोटी नाटुकली सादर केली जाते. मुलांना दहा दिवस कार्यक्रमांची, प्रसादाची चंगळ असे.

गावस्वरूपी मंदिराजवळ गणरायाची स्थापना, आरतीनंतरचा प्रसाद तैयार होई. (Ganesh Chaturthi 2023) घराघरांतून वर्गणी गोळा करून गणरायाच्या शेवटच्या दिवशी गावागावांतील, घराघरांतील व्यक्ती मिरवणुकीत सामील होऊन गणरायाचा विसर्जन कार्यक्रम पार पाडत असत. पण आजच्या काळात छोटासा गणपती महाकाय रूप घेऊन अवतरला आहे. स्पर्धेपोटी गणपतीचा आकार वाढतच चालला आहे. त्यामुळे मुळ हेतू बाजूलाच राहतो आणि गणेशोत्सव असावा कि नसावा? हा प्रश्न पडतो. एकीचे तत्व बाजूला राहून निरनिराळ्या मवाली टोळक्यांचे भांडणं, त्यांचा सहभाग झाल्याने देव आहे का नाही? हा प्रश्न पडण्याइतपत देवाचे अस्तित्व प्रश्नांकित होते.

सध्या लोक एकमेकांना ओळखत नाहीत, तरीही लोक गणेशोत्सवाद्वारे एकत्र जमतात, ज्यामुळे लोक एकमेकांना ओळखतात आणि यामुळे लोकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. (Ganesh Chaturthi 2023) जे आपल्या देशाला एकत्र आणि बळकट करते.

Leave a Comment